धावत्या ट्रेनमध्ये चाकू हल्ला

धावत्या ट्रेनमध्ये चाकू हल्ला

कल्याण ते डोंबिवली दरम्यान धावत्या लोकल ट्रेनमध्ये चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने तीन प्रवाशांवर चाकूने सपासप वार केल्याची घटना समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण ते डोंबिवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. शेख जिया हुसेन (वय १९ ) असं आरोपीचं नाव आहे. या चाकू हल्ल्यात अक्षय वाघ, हेमंत काकरिया, राजेश चांगलानी हे तीन प्रवाशी जखमी झाले आहेत.
जखमी प्रवाशांनी दादरला सकाळी 09:47 वाजताची फास्ट लोकल ट्रेन कल्याण स्टेशनवरून पकडली होती. त्याच गाडीमध्ये आरोपी इसम शेख जिया हुसेन हा चढला होता. त्याला मुंब्रा स्टेशनवर उतरायचं होतं. दरम्यान, ट्रेनमधील प्रवाशांनी आरोपी हुसेनला सांगितलं की, ही लोकल ट्रेन फास्ट आहे आणि मुंब्रा स्टेशनवर थांबणार नाही. असं कळताच त्याने धावत्या लोकलमधून उतरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सहप्रवासी लोकांचा धक्का बसला. धक्का लागल्यामुळे त्यांच्यामध्ये वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. सदरील आरोपीला प्रवाशांनी मारहाण केली. त्यामुळे संतापलेल्या हुसेननं खिशातील चाकू काढून प्रवाशांवर वार केले. त्यामध्ये तीन लोक जखमी झाले आहेत.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा