मनपाच्या कचरा  डेपोला आग

औरंगाबाद /प्रतिनिधी - हर्सूल येथील मनपा जुन्या जकात जवळील कचरा प्रकल्प डेपो मध्ये आज  पहाटे आग लागण्याची घटना घडली. यात प्रकल्पातील मशिनरी व साहित्य जळून खाक झाले आहे. सकाळी आग लागल्याचे कळताच अग्निशमन दलाच्या वतीने आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

<span;>सकाळी आग लागल्याचे कळताच अग्निशमन दलाला बोलाविण्यात आले. यावेळी  <span;>सिडको अग्निशामक दल मधून एक गाडी पदमपुरा येथील दोन गाड्या व 4 वॉटर टँकर यांसह
औरंगाबाद अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी आर के सुरे यांच्या मार्गदर्शनखाली, उप अग्निशमन आधिकारी शरद घाटेशाही ,अब्दुल अजीज,अग्निशमन दलाचे पथक, ड्युटी इंचार्ज संजय कुलकर्णी,
अग्निशामक सोमीनाथ भोसले, वेलदोडे पद्माकर बकले,अजिंक्य भगत,माजित,
वाहनचालक बबन माऊले यांनी घटनास्थळी येत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.वतीने आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. कचरा प्रकल्पातील सीसीटीव्ही कॅमेरे खाली पडलेले दिसून आले ,या मुळे आग लागल्याचे  कारण अद्यापही कळले नाही.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा