दाम्पत्याची क्रुरपणे हत्या घरातच कुजलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह

दाम्पत्याची क्रुरपणे हत्या   घरातच कुजलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह

औरंगाबाद/प्रतिनिधी - पुन्हा एका दाम्पत्याच्या क्रूर हत्येने शहरात संतापाची लाट पसरली आहे. पुंडलिकनगर येथे कुजलेल्या अवस्थेत पती-पत्नीचा मृतदेह आढळून आला आहे. या दाम्पत्याची हत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. 

पुंडलिक नगर येथे राहणारे पती शामसुंदर कलंत्री (वय - ५५), पत्नी किरण कलंत्री (वय -४५) यांची राहत्या घरात निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सदर हत्या त्यांच्या मुलाने केली असल्याचा पोलिसांना संशय आहे. दोघांचे मृतदेह घरात कुजलेल्या अवस्थेत आढळले असून हत्या केल्यानंतर दोन्ही मृतदेहांना घराच्या वेगवेगळ्या मजल्यावर ठेवण्यात आले. विशेष म्हणजे दोन्ही मृतदेह पलंगाखाली लपवून ठेवलेले आढळले.  हे वृत्त प्रकाशित करेपर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, सातत्याने होत असलेल्या हत्यांनी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. १९ वर्षीय महाविद्यालयीन युवतीच्या हत्येने शहरात संताप व्यक्त असतानाच पती-पत्नीच्या हत्येने खळबळ उडाली आहे. शहरात कायद्याचा काही धाक उरला आहे का असा सवाल देखील उपस्थित होत आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा