अधिकारी पहिल्या दिवशी देणार सर्व शाळेला भेट

अधिकारी पहिल्या दिवशी देणार सर्व शाळेला भेट

औरंगाबाद / प्रतिनिधी - औरंगाबाद महानगरपालिकेचा शैक्षणिक वर्ष 2022 -23 वर्षाच्या   सर्व शाळा बुधवारी 15 जून रोजी सुरवात होणार असून, चिमुकल्यासह विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मनपा शिक्षण विभागाने तयारी केली आहे.औंरगाबाद महानगरपालिका चे वर्ग 1 आणि वर्ग 2 चे अधिकारी शाळेच्या पहिल्या दिवशी देणार मनपाच्या सर्व शाळेला भेट.

महानगर पालिकेच्या 71 शाळा दिनांक 15 जून 2022 रोजी सुरू होत आहेत. मनपा शाळेचा पहिला दिवस आनंददायी , चैतन्यपूर्ण व उत्साह वर्धक होण्यासाठी महापालिकेतील सर्व अतिरिक्त आयुक्त, सर्व उप आयुक्त , सर्व सहाय्यक आयुक्त, सर्व झोन  अधिकारी, सर्व झोन अभियंता तसेच डायट चे सर्व अधिव्याख्याता मनपा च्या प्रत्येक एका शाळेला भेट देतील.

 प्रत्येक शाळेत  शाळा प्रवेशोत्सव या कार्यक्रमात हे सर्व अधिकारी सहभागी  होऊन नवीन प्रवेशित मुलांचे फुल देऊन स्वागत करणे, सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करणे, गणवेश वाटप करणे आणि  मिष्ठांन गोड पदार्थ वाटप करण्यात येईल  आणि मुलांचा आनंद द्विगुणित करतील.
    यावेळी जास्तीत जास्त मुलांनी मनपा शाळेत प्रवेश घेण्यासाठी दि 15 ते 30 जून 2022 या कालावधीत  प्रवेश पंधरवडा राबविण्यात येईल अशी माहिती शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे  व ज्ञानदेव सांगळे सहायक कार्यक्रम अधिकारी यांनी दिली.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा