लहान मुलाला आंघोळ घालण्यासाठी घरातून बाहेर पडल्या आणि....
कोल्हापूर /प्रतिनिधी - नात्यातील लहान मुलांना अंघोळ घालण्यासाठी सकाळी साडेनऊ वाजता घरातून बाहेर पडल्या आणि दुर्दैव आडवे आले, रस्ता ओलांडताना एसटीच्या मागील चाकाखाली सापडून कदमवाडी येथील नकुशी बाबुराव हुंबे (वय 57, रा. कदमवाडी, साळोखे मळा) यांचा मृत्यू झाला.मुक्त सैनिक वसाहत रोडवर रविवारी सकाळी ही दुर्घटना घडली.
नात्यातील लहान मुलांना अंघोळ घालण्यासाठी हुंबे सकाळी साडेनऊ वाजता घरातून बाहेर पडल्या. मुक्त सैनिक वसाहत येथे रस्ता ओलांडत असताना त्या एसटीच्या मागील चाकात सापडल्या. एसटी चालकासह नागरिकांनी गंभीर अवस्थेत त्यांना तत्काळ शासकीय रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. हुंबे यांचा मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबीय व नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली. मनाला चटका लावणार्या या घटनेमुळे साळोखे मळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.