मनपाच्या औषधी भांडारगृहाची जागा बदलणार का व कुठे ते पहा
औरंगाबाद /प्रतिनिधी- महानगरपालिका आरोग्य विभागाच्या विविध आरोग्य केंद्रातील अस्ताव्यस्त पडलेले समान आणि मनपाचे शहरात एकच छाताखाली म्हणजे मुख्य भांडारगृह करण्याच्या अनुषंगाने हडको येथील ताठे मंगल कार्यालयात शिफ्टिंग करण्याची हालचाली मनपा आरोग्य विभागाने सुरू केली आसून , भांडारगृहा साठी ही जागा तब्यात घेतली आसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली .
मनपाचे सिडको येथील मुख्य औषधी भांडार जुना मोंढा वॉर्ड कार्यलाय भवानीनगर येथे काही महिन्यांपूर्वी शिफ्ट केले होते. यानंतर येथून रेमडेस्विर इंजेक्शनचा बॉक्स गायब झाल्याची घटना घडली होती. या प्रकारानंतर भांडार गृहाची अवस्था व सुरक्षा रामभरोसे असल्याचे निदर्शनास आली होती, या शिवाय बुहतांश कोरोंना सेन्टर व आरोग्य केंद्रावरील समान विविध केंद्रात पडून आहे ,म्हणून हे सर्व सामान व मुख्य भांडरगृह एकाच छताखाली असावे या करिता , प्रशासनाने भांडारगृह शिफ्टिंगचा निर्णय घेतला आहे. याकरीता सिडको हडको ताठे मंगल कार्यालय ताब्यात घेण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.
कोरोना ग्रस्त गंभीर रुग्णांवर उपचाराकरिता रेमडेस्विर हे इंजेक्शन वापरले जातात. दुसऱ्या लाटेत याचा शॉर्टेज असल्याने सर्वत्र या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे प्रकार समोर आले. जुना मोंढा परिसरातील भवानीनगर येथील मनपाच्या जून्या वार्ड कार्यालयालगत, काही महिन्यांपूर्वीच औषधी भांडार शिफ्ट करण्यात आले. येथून तब्बल 48 रेमेडीसिवर गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यात मनपाचा अजब कारभार समोर आला. येथून जी काही औषधे दिली जातात. ती घेऊन जाताना तीच औषधे बाहेर जात आहेत काय ? याची कुठलीही खात्री किंवा तपासणी केली जात नाही. यासह सुरक्षेचे तीन तेरा झाले होते.यानंतर प्रशासनाने या ठिकाणी तात्पुरत्या सुरक्षेची व्यवस्था केली होती. आता हे भांडार गृह सिडको परिसरातील ताठे मंगल कार्यालय येथे स्थलांतरित केले जाणार आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली. कार्यालयाची जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असून, यानंतर दुरुस्ती व डागडुजी केली जाईल. यानंतर येथे भांडार गृह शिफ्ट केले जाईल.