शहरातील नामवंत राज क्लॉथ स्टोअर सील
औरंगाबाद / प्रतिनिधी - शहरातील बीड बायपास रोडवरील प्रसिद्ध राज क्लॉथ स्टोअर ला मनपा व जिल्हा आणि उपायुक्त कामगार विभागाने संयुक्त रित्या विना लसिकरण अंतर्गत कारवाई करत सील केले.
शहरात रुग्णांची वाढती संख्या पाहता निर्बंध अतिशय कडक करण्यात आले आहेत. कोविडच्या नियमांचे पालन न केल्यास महापालिका व संबंधित विभागाकडून कारवाई केली जात आहे. लसीकरण अनिवार्य केलेले असतानाही अनेक लोक लसीकरण करत नाहीत. अशा लोकांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी केलेली आहे. दुकान हॉटेल सिनेमागृह यांना देखील या संबंधित निर्देश देण्यात आलेले आहेत असे असताना देखील लसीकरण न केलेल्या लोकांना प्रवेश दिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचे समजते.