ओमीक्रोन सोबत लढायला महापालिका सज्ज राज्यसरकारकडून ३० कोटीच्या निधीची मागणी

औरंगाबाद/ प्रतिनिधी- कोरोनाचा नवा व्हेरिंएट ओमीक्रोन जो कोविड १९ पेक्षा अतिशय घातक आहे त्याचा सामना करण्यासाठी औरंगाबाद महापालिका सर्वतोपरी तयार आहे तरीदेखील नागरिकांनी कोविडच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करत लसीकरण देखील जरूर करून घ्यावे असे आवाहन मनपा प्रशासक तथा आयुक्त अस्तीक कुमार पांडेय यांनी केले आहे. 
         ओमिक्रोन हा अतिशय घातक व्हेरिंएट असून दक्षिण आफ्रिकेत ज्याप्रमाणे तो पसरला आहे त्याप्रमाणे सर्वानीच अतिशय सतर्क राहणे गरजेचे आहे. दक्षिण आफ्रिकेनंतर युरोप व आशियात तो वेगाने पसरत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी औरंगाबाद महापालिकेने पूर्वतयारी सुरु केली आहे .   
    मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले की, प्रथम आम्ही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून लहान मुलांच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय १० डिसेंबर पर्यंत लांबणीवर टाकला असून स्मार्ट हेल्थ केअर मार्फत १५ नवे आरोग्य केंद्र व मल्टी हॉस्पीटल सेंटर बनवणार आहोत. त्याचसोबत सध्या सुरू असलेल्या १३ कोरोना उपचार केंद्रांचे नुतनीकरण करण्यात येणार आहे़.  तसेच  रूग्णाच्या औषधी,अ‍ॅम्बुलन्स,लसीकरण,बायोमेडीकल वेस्ट यासाठी लागणाऱ्या  खर्चासाठी राज्यसरकारकडून ३० करोडच्या निधीची मागणी करण्यात आली आहे असेदेखील माध्यमांशी बोलतांना त्यांनी सांगितले

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा