मित्राच्या पत्नीवरच केला अत्याचार आरोपी पोलिस कोठडीत
वाळूज/प्रतिनिधी - मी जे सांगेल ते ऐक अन्यथा तुझ्या पतीला ठार करेल अशी धमकी देऊन मित्राच्या पत्नीवर अत्याचार केल्याची घटना बजाज नगर परिसरात नुकताच घडली आहे. या अत्याचार प्रकरणी आरोपी नितीन हरिश्चंद्र शिंदे (२६, रा.कळंकी, ता.कन्नड, ह.मु.बजाजनगर) यास दि.१७ डिसेंबर रोजी पोलिसांनी जेरबंद केले आहे.
बजाजनगर परिसरात पिडीत विवाहिता पती व दोन मुलीसह वास्तव्यास आहेत. या महिलेचा पती वाहनचालक म्हणून काम करतो तर पिडीत महिला घरातच किराणा दुकान चालवुन कुटुंबास हातभार लावते. पिडीत महिलेच्या पतीचा मित्र नितीन हरिश्चंद्र शिंदे (२६ रा.कळंकी ता.कन्नड, ह.मु.बजाजनगर) याचे गत दोन वर्षापासून मित्राच्या घरी येणे-जाणे सुरु होते.अशातच १० डिसेंबरला पिडीत महिलेचा पती ट्रॉन्सपोर्टच्या वाहनात मोसंबी घेऊन मुंबईला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईत थांबला होता. दरम्यान, महिनाभरापुर्वी नितीन शिंदे हा मित्राची पत्नी चालवित असलेल्या किराणा दुकानावर गेला होता. यावेळी नितीन याने मित्राच्या पत्नीला ‘तु मला खुप आवतडेस, पण ही गोष्ट तुझ्या नवऱ्याला माहीत नाही झाली पाहिजे, नाहीतर तुझा नवरा नेहमी बाहेर असतो, मी त्याचे बरे-वाईट करीन अशी धमकी दिली होती. या धमकीमुळे घाबरलेल्या महिलेने या प्रकाराची माहिती पतीला दिली होती. मात्र नितीन हा मित्र असल्याने पिडीत महिलेच्या पतीने याकडे दुर्लक्ष केले होते.
पिडीत महिलेचा पती व नितीन शिंदे हे दोघेही मित्र असून ते वाहनचालक म्हणून काम करतात. १० डिसेंबरला पिडीत महिलेचा पती ट्रॉन्सपोर्टचे भाडे घेऊन मुंबईला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईत मुक्कामाला थांबला होता. मित्र मुंबईला गेला असल्याने त्याची पत्नी घरात एकटीच असल्याची संधी साधुन नितीन शिंदे यांने ११ डिसेंबरला रात्री मित्राच्या पत्नीला फोनवरुन संपर्क करुन मी रात्री तुला भेटण्यासाठी येणार असल्याचे सांगितले. मात्र पिडीत महिलेने नितीन यास घरी येण्यास विरोध केला होता. दरम्यान, रात्री १२.३० वाजेच्या सुमारास पिडीता मुलीसोबत घरात झोपेली असतांना आरोपींनी तिच्या घरचा दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडल्यानंतर नितीन शिंदे याने घरात प्रवेश करुन पिडीतेला मला तुला गिफ्ट द्यायचे आहे, काय देऊ असे म्हणून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. मात्र पिडीतेने मला तुझे गिफ्ट नको असे म्हणताच आरोपी नितीन शिंदे याने तिला किचनरुममध्ये नेऊन बळजबरीने अत्याचार केला. या प्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरुन आरोपी नितीन शिंदे याच्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आरोपी नितीन शिंदे यास बजाजनगरात जेरबंद केले. त्याला न्यायालयात हजर केले असता त्यास चार दिवसांची म्हणजे २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.