पोलादपूर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटामध्ये पोलादपूरच्या दिशेने निघालेल्या रेनॉट लॉजी कारने अचानक पेट घेतल्यानंतर काहीच क्षणात कारला ज्वाळांनी चहूबाजूंनी लपेटले.
यावेळी कारमधून गणपतीपुळे ते कोपरखैरणे असा प्रवास करणारे जोडपे सुदैवाने बचावल्याची माहिती कशेडी येथील वाहतूक पोलीस उपनिरिक्षक ए.पी.चांदणे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस दिली.
बुधवार, दि. 3 मे 2023 रोजी सकाळी 12 वाजून 23 मिनीटांनी कशेडी घाटात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर स्वामी समर्थ कशेडीमठाखालील बाजूला गणपतीपुळे ते कोपरखैरणे नवी मुंबई सेक्टर 10 अशी रेनॉट लॉजी कार चालवित (एमएच 43 इडब्ल्यू 0710) चालक मालक विष्णू सर्जेराव गरजे (रा.नवी मुंबई कोपरखैरणे) हे पत्नी सौ.प्रतिभा विष्णू गरजे व अन्य 8 असे कार मधून जात असताना कारच्या बॉनेटमधून धूर येऊ लागल्याने सर्व प्रवासी गाडीमधून उतरून बाजूला थांबले. त्याचवेळी गाडीने चहूबाजूने पेट घेतला. यावेळी काही वेळातच गाडी संपूर्ण जळून खाक झाली आणि गाडीचे 100 टक्के जळून नुकसान झाले. खेडपोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस निरिक्षक गडदे व सहकारी यांनी समक्ष येऊन कारवाई केली.
दुपारी पाऊण वाजण्याच्या सुमारास कशेडी टॅप वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर दीड वाजण्याच्या सुमारास आग पूर्णपणे नियंत्रणात आली. मात्र, संपूर्ण रेनॉट लॉजी कार जळून खाक झाली होती.