ग्लोबल महाराष्ट्र कार्यक्रमात मनपा विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी होणार
औरंगाबाद /प्रतिनिधी - स्वतंत्र भारताच्या 75व्या वर्षाच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून जर्मनीत राहणाऱ्या मराठी व्यक्तींद्वारे महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या 75 शाळा जोडण्याचा व मार्गदर्शनाचा प्रस्ताव आहे. येत्या 15 ऑक्टोबर 2021 रोजी जागतिक विद्यार्थी दिनानिमित्त भारतीय वाणिज्य दूतावास म्यूनिक जर्मनी (Consulate General of India, Munich) द्वारे दुपारी अडीच वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आयोजित केली जाणार आहे.
औरंगाबाद मनपा शाळांचा सहभाग
या संदर्भात मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाने महानगरपालिकेचे माध्यमिक शाळेचे सर्व मुख्याध्यापक व डॉ. सुरेश चव्हाण यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून मनपाच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग या उपक्रमात राहणार आहे असे ठरविण्यात आले. याचे नियोजन सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार व शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे हे करीत आहेत.
जर्मनी मध्ये काम करत असणारे भारतीय विदेश सेवेचे मराठी अधिकारी डॉ. सुयश यशवंतराव चव्हाण (IFS) यांची ही संकल्पना आहे. यासाठी महाराष्ट्रातील दुर्गम भागातील, ग्रामीण, शासकीय, मनपा शाळांना प्राधान्य दिले जाणार आहे व महाराष्ट्रभरात विद्यार्थी व शिक्षकांची एक टीम तयार केली जात आहे.
1. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चे उद्देश एकविसाव्या शतकातील कौशल्यवान व जागरूक विद्यार्थी घडवणे आहे. भारताबाहेर विदेशात राहणारे भारतीय लोक हे अनुभवांचे आणि माहितीचे भांडार आहेत जे आपल्या येणाऱ्या पिढीसाठी मौल्यवान दृष्टी प्रदान करू शकतात. विदेशात राहणारे भारतीय हे भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमधून आणि वेगवेगळ्या समाजामधून येत असतात . त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाचा व संसाधनांचा वापर भारतातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर जोडायला व जागतिक स्तरावर सुरू असलेल्या घडामोडींची जागरूकता निर्माण करण्यासाठी केला जाणार आहे.
2. जर्मनी हे जगातील एक प्रगत राष्ट्र आहे.. दक्षिण जर्मनीतील प्रमुख जर्मन कंपन्या जसे की BMW, Bosch, Diamler, Siemens इत्यादी यांनी भारतामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे व हजारो रोजगार निर्माण केले आहेत .मोठ्या संख्येने महाराष्ट्रात जर्मन कंपन्यांची उपस्थिती आहे. जर्मनी मध्ये स्थित असलेले मराठी लोक हे व्यवसायिक, संशोधक, विद्यार्थी, तंत्रज्ञान तज्ञ आहेत जे की आपल्या अनुभवांचे वर्णन व जर्मनी मध्ये असलेल्या वेगवेगळ्या संधींबाबत मार्गदर्शन करू शकतात.
3. 'ग्लोबल महाराष्ट्र - स्टुडंट्स ऑफ द फ्युचर' हा उपक्रम भारतीय वाणिज्य दूतावास म्यूनिक जर्मनी ने हाती घेतला आहे. जर्मनी मध्ये स्थित असलेल्या मराठी तज्ञांचा महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी शाळा कॉलेज शी जोडण्याचा हेतू आहे ज्याने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारच मार्गदर्शन आणि शैक्षणिक व औद्योगिक संधींची माहिती घेता येईल.
उद्दिष्ट: "जागतिक विद्यार्थी दिनानिमित्त" दक्षिण जर्मनीमध्ये स्थित मराठी व्यक्तींना महाराष्ट्रातील 75+ शाळांशी जोडणे. हा उपक्रम 15 ऑक्टोबर 2021 रोजी भारतीय वाणिज्य दूतावास म्युनिक जर्मनी द्वारे व्हिडीओ
कॉन्फरन्सिंगद्वारे दुपारी 2:30 वाजता घेण्यात येणार आहे .
कार्यपद्धती
1) महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील शाळा सहभागी होऊ शकतात.
2) दोन विद्यार्थी प्रत्येकी 7वी, 8वी व 9वी या इयत्तेतील असतील व सोबत एक प्रभारी शिक्षक जे की शाळेचे प्रतिनिधीत्व करतील . शक्यतो प्रत्येक शाळेतील मुला आणि मुलींची संख्या समान असावी.
निवडल्या गेलेल्या प्रश्नांचे उत्तर उपस्थित मान्यवर हे देतील. कार्यक्रमादरम्यान बहुतांश वेळी मराठी भाषेचा उपयोग केला जाईल जेने करून प्रत्येक प्रश्नाचे समाधानी उत्तर मिळेल.
पुढचा टप्पा:
महाराष्ट्रातील अधिकाधिक शाळांचा समावेश करण्यासाठी या उपक्रमाचा विस्तार केला जाईल.
आठवड्यातून एक दिवस उदाहरणार्थ गुरुवारी दुपारी एक वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागृकता वर्ग (Dr. B R Ambedkar Global Awareness Period) असा सर्व शाळांनी नियमित मार्गदर्शन कार्यक्रम बनवावा.जर्मनीतील सदस्य विद्यार्थ्यांना पूर्वनियोजित विषयावर मार्गदर्शन करतील . तसेच विषय आणि त्यांच्या निगडित वक्ते यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.
जर्मनीतील महाराष्ट्रीयन व्यक्ती आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना सुद्धा मार्गदर्शन करतील आणि त्यांच्या मूळ जिल्ह्यातील शाळांना प्रोत्साहन आणि संसाधने प्रदान करतील.
ह्या उपक्रमाची पुढे चालून भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये पुनरावृत्ती केली जाईल व वेगवेगळ्या देशातील भारतीय लोकांशी संवाद साधला जाईल.
फायदे
विद्यार्थ्यांना जागतिक संधी आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यास तयार करणे.
विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये असलेल्या शैक्षणिक आणि करियर संधी बद्दल जागरूक करणे.
करिअर मार्गदर्शनासाठी लागणारे गाईडन्स, अनुभव, माहिती या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना देणे.
जर्मन भाषा आणि संस्कृती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे.
परदेशात राहणाऱ्या भारतीयांचा भारताच्या विकासामध्ये मोठा वाटा आहे. भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्याचा हा अनोखा उपक्रम.