सुबह का भुला शाम को घर वापस आया

औरंगाबाद / प्रतिनिधी - कन्नडचे आमदार उदय सिंग राजपूत हे बंडखोर नेते एकनाथ शिंदे बरोबर सुरतला गेले होते ते त्यांना सोडून पुन्हा शिवसेनेकडे परत आले त्यामुळे त्यांचे विमानतळावर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेकांनी स्वागत केले.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, कन्नडचे शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांचे संभाजीनगर विमानतळावर शिवसैनिकांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी मराठवाडा विभागीय सचिव ऍड. अशोक पटवर्धन, माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख आनंद तांदूळवाडीकर , शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, उपशहर प्रमुख हिरालाल सलामपुरे, राजू खरे, माजी नगरसेवक वीरभद्र गादगे, देविदास रत्नपारखी, दिनेश तिवारी, लक्ष्मण गिऱ्हे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. 

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा