तिसऱ्या लाटेसाठी आता मनपा सज्ज
औरंगाबाद /प्रतिनिधी - महानगरपालिकेच्या 9 आरोग्य केंद्रात जवळपास 366 नवीन ऑक्सिजन बेड उभारणी करण्याची तयारी मनपा आरोग्य विभागाने सुरू केली आहे.
कोरोंनाच्या तिसऱ्या लाटीच्या अनुषंगाने महानगरपालिका आरोग्य विभागाने पूर्व तयारी सुरू केली आसून,शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मनपाच्या 9 आरोग्य केंद्रात जवळपास 366 ऑक्सिजन बेड ची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये सिडको एन 8 येथे 40 ,एन 11 40, बन्सीलाल नगर आरोग्य केंद्र 16,सिल्कमिल कॉलोनी 20,राजनगर आरोग्य केंद्र,EOC येथे 100,चिखलठाना 14, नेहरू नगर 100 तर कैसर कॉलोनी आरोग्य केंद्रावर 10 असे एकूण 316 आणि वाढीव 50 बेड असलेले ऑक्सिजन बेड असणार आहेत.
या आरोग्य केंद्रांवर ऑक्सिजन सुविधा पुरविण्यासाठी काम सुरू करणार असून यामुळे मनपाचा मेलट्रॉन व इतर हॉस्पिटल वरील ताण कमी होऊन रुग्णांना शहरातच मनपाच्या आरोग्य केंद्रात o2 बेड उपलब्ध होईल.
दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन बेडची कमतरता भासल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांचे हाल झाले होते आणि शासकीय हॉस्पिटल व इतर रुग्णालयात वेटींग असल्याने नागरिकांना धावपळ करावी लागली होती.
येत्या काही दिवसात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असल्याने मनपा आरोग्य विभागाने या आगोदरच तयारी सुरू केली आहे. येत्या काही दिवसात या आरोग्य केंद्रावर सर्व तयारी पूर्ण होऊन सर्व सुविधा युक्त ऑक्सिजन खाटा चे हॉस्पिटल पूर्ण होईल.