मुलीचे अपहरण लोकांनी अडविली गाडी पोलिसांनी पकडल्यावर उलगडले रहस्य
संभाजीनगर /प्रतिनिधी - चापiणेर ते हसंनखेडा रस्त्यावर आज एक थरारक घटना घडली आहे. एका १६ वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण करण्यात आले होते परंतु लोकांनी गाडी अडवून त्या मुलीची सुटका केली. अपहरणकर्त्याना पकडल्यानंतर जे सत्य समोर आले ते चकित करणारे होते.
चापiणेर ते हसंनखेडा रस्त्यावर आज एक भयानक घटना घडली. जातेगiव तां नांदगाव येथील 16 वर्षीय तरुणी शाळेतून घरी जात असताना पाठीमागून आलेल्या छोटा हत्ती गाडीतील एका सराईत गुन्हेगाराने मुलीला बेशुद्ध करून गाडीत टाकले. जवळच शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्याने ही घटना पहिली व मनेगाव फाट्याच्या दिशेने भरघाव वेगात निघालेल्या या गाडीची फोनवरून माहिती दिली. मनेगाव फाट्यावर लोकांनी अपहरणकर्त्याच्या गाडीचा रस्ता अडवला परंतु त्याने गाडी अजून जोरात चापानेरच्या दिशेने नेली. औरळi फाटा, हसन खेडा येथेही असाच प्रकार झाला परंतु तेथे ट्रॅक्टरने गाडी अडवली व मुलीची सुखरूप सुटका केली. मुलगी बेशुद्ध अवस्थेत दिसून आली. घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपीला अटक करण्यात आली. मात्र त्याने जे सांगितले ते ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले.
अपहरणकर्ता निघाला नातेवाईकच
मुलीचे अपहरण करणारा हा त्या मुलीचा नातेवाईकच निघाला. या घटनेमध्ये मुलगी ही वैजापूर तालुक्यातील वाकला या गावाची असून ती अपहरण करणाऱ्या मुलाच्या चुलत मामाची मुलगी आहे. ते दोघेही एकमेकांना चांगले ओळखतात व लोकांचा गैरसाज झाल्यामुळे त्यांनी आपल्याला मारले असे तरुणाने सांगितले. पोलीस या घटनेत दुसरा काही उद्देश आहे का याची माहिती घेत आहेत. पुढील तपास शिऊर पोलीस करत आहेत.