'WHO'साठी 'हे' 5 भयंकर आजार ठरतायत डोकेदुखी

'WHO'साठी 'हे' 5 भयंकर आजार ठरतायत डोकेदुखी

नवी दिल्ली: कोरोना आता शांत झाला आहे. ही संख्या कोरोनाच्या पहिल्या व दुस-या लाटेच्या तुलनेत फार कमी झाली आहे. हा एक दिलासा आहे. परंतु या न टळलेल्या संकटासोबत आता आणखी एक संकट जगासमोर आ वासून उभे राहिले आहे. ते म्हणजे मंकीपॉक्स.(monkeypox) केरळमध्ये पहिली केस सापडल्यानंतर देशात धुमाकूळ सुरू झाला. यासंबधी खबरदारीचा इशारा WHO ने दिला आहे.

याशिवाय स्वाईन फ्ल्यू (swine flu), मलेरिया (malaria) आणि डेंग्यूचा (dengue) कहर देखील वाढत चालला आहे. पावसाळ्यात इम्युनिटी कमजोर असल्याने जीवाचा धोका वाढलेला असतो.

कोविड-19
सध्या कोरोनची लाट नाही पण आजही देशात कोरोनामुळे मृत्यू होत आहेत. आजही हा आजार रोखण्यासाठी WHO प्रयत्न करत आहे.

मंकीपॉक्स
मंकीपॉक्सचा प्रभाव संपूर्ण जगात वाढत चालला आहे. भारतात सुद्धा मंकीपॉक्सने एन्ट्री केली आहे. या आजाराचा वाढत प्रभाव पाहून WHO ने मंकीपॉक्स आजाराला जागतिक महामारी (global health emergency) म्हणून घोषित केले आहे.

 टोमॅटो फिव्हर
केरळमध्ये मंकीपॉक्स बाधित व्यक्तिमध्ये आधी टोमॅटो फिव्हर आढळला होता. लहान मुलांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात दिसून येतो. भारतात टोमॅटो फिव्हरची साथ येते की काय याची भीती सगळ्यांना वाटत होती. पण वेळीच हा आजार नियंत्रणात आला आहे. हा आजार हात, पाय आणि तोंडाचा आजार म्हणून ओळखला जातो. या आजारात शरीरावर लाल चट्टे येत असल्यानेच या आजाराला टोमॅटो फिव्हर म्हटले जाते.

जपानी फिव्हर
जपानी इंसेफेलाइटिस एक असे संक्रमण आहे जे माणसांना मच्छरपासून होऊ शकते. मस्तिष्कचे हे संक्रमण मच्छरांपासून डुकरांपर्यंत आणि त्यांच्यापासून माणसांपर्यंत पोहचू शकते. भारतात सध्या जपानी फिव्हरचे प्रमाण वेगाने वाढत आहे. दरवर्षी पावसाळ्यात हा आजार तीव्र स्वरूपात दिसून येतो. 2022 मध्ये आतापर्यंत जापानी इंसेफेलाइटिसमुळे 32 लोकांचा मृत्यू झाला आहे.

डेंग्यू
डेंग्यूला आजही आपल्याकडे सामान्य समजण्याची चूक केली जाते. पण हा आजार या वरील चार आजारांएवढाच गंभीर आहे हे प्रत्येकाने लक्षात घेणे गरजेचे आहे. हा आजार जीवघेणा असून वेळीच उपचार झाले नाही तर रूग्णाचा मृत्यू होऊ शकतो.

 
 

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा