Bus Accident : जळगाव आगाराची बस नर्मदा नदीत कोसळली,१३ प्रवाशांचा मृत्यू!
मुंबई : मध्य प्रदेशातील खरगोन आणि धार या जिल्ह्यांच्या लगत नर्मदा नदीत बस कोसळून १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ही बस एसटी महामंडळाच्या जळगाव विभागातील अमळनेर आगाराची होती. बहुतांश प्रवासी जळगाव जिल्ह्यातील असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर 12 ते 15 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. अजूनही बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अमळनेर आगाराची अमळनेर ते इंदूर या मार्गावर बससेवा सुरु आहे. सकाळी साडेसातला इंदूर येथून अमळनेर आगाराची बस परतत होती. खरगोन आणि धार या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणार्याि खलघाट गावाजवळ आल्यानंतर बस नर्मदा नदीपात्रात कोसळली. बसमध्ये सुमारे पन्नास ते साठ प्रवासी असून, यातील काही प्रवासी बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आत्तापैकी सात पुरुष आणि चार महिलांचे मृतदेह सापडले आहेत. मात्र, मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. या भीषण अपघातानंतर परिसरातील लोकांच्या मदतीने पोलीस प्रशासनाने शोधकार्य सुरु केले आहे. अपघातासंदर्भात माहिती मिळविण्यासाठी एसटी महामंडळाने ०२२/२३०२३९४० हा हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.
मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज एसटी महामंडळाची बस बुडून झालेल्या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी महामंडळाला दिले आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 18, 2022 ">
मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज एसटी महामंडळाची बस बुडून झालेल्या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी महामंडळाला दिले आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 18, 2022
मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज एसटी महामंडळाची बस बुडून झालेल्या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी महामंडळाला दिले आहेत.
जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु
बस क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात येत असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासन खरगोन व धार जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत. अपघातग्रस्त व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. घटनास्थळी मदतीसाठी ०९५५५८९९०९१ हा हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे.
मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत द्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मध्य प्रदेशातील नर्मदा नदीमध्ये राज्य परिवहन महामंडळाची बस कोसळून १३ प्रवाशांता मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. बचावकार्य व्यवस्थित पार पाडावं व जखमींवर उपचारासाठी मध्यप्रदेशमधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश त्यांनी जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी संपर्क साधला आणि सहकार्यासाठी विनंती केली. यादरम्यान त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.