मोदीजी तुम्ही माझे आयुष्य उद्धवस्त केलेत, मला रात्रीची झोप येत नाही; राखी सावंतचा आरोप

मोदीजी तुम्ही माझे आयुष्य उद्धवस्त केलेत, मला रात्रीची झोप येत नाही; राखी सावंतचा आरोप

मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री राखीने कोरोनापासून वाचण्यासाठी बूस्टर डोस घेतला. मात्र हा डोस घेतल्यानंतर तिचे आयुष्य उद्धवस्त झाल्याचा आरोप राखीने केला आहे. मला रात्रीची झोप येत नाही, असा दावा करत राखीने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. नुकतंच पत्रकारांशी संवाद साधताना तिने याबाबतचे वक्तव्य केले आहे.

राखी सावंत ही सोमवारी मुंबई विमानतळावर गेली. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्सने तिला विविध प्रश्न विचारले. यावेळी तिने पंतप्रधान मोदींवर थेट आरोप करण्यास सुरुवात केली. “मोदीजी तुम्ही माझे आयुष्य उद्धवस्त केले आहे. मी गेल्या दोन रात्रींपासून झोपलेली नाही. बूस्टर डोस घेतल्यापासून मला झोपचं येत नाही. माझ्या हृदयाची धडधड वाढली आहे. माझे शरीर वेगवेगळ्या गोष्टी मागत आहे. मी फार अस्वस्थ झाली आहे.” असे राखी म्हणाली.

">

 “बूस्टर डोस घेतल्यापासून माझ्या शरीरात काय सुरु आहे हेच मला कळत नाही. माझा चेहरा सुजलेला आहे. मला अजिबात झोप येत नाही. माझी अवस्था खूप वाईट आहे. याचे परिणाम पाहून मला वाटते की हे बूस्टर इंजेक्शन ६०, ७०, ८०, ९० वयाच्या व्यक्तींना द्यायला हवे. ज्यांना चालता-फिरता येत नाही.” असेही राखीने म्हटले.

“मी बूस्टर डोस घेतल्यापासून वेड्यासारखी झाली आहे. मी फक्त आदिलला शोधत आहे. आताही मी त्यालाच भेटायला जात आहे. यावरुन तुम्ही बुस्टर डोसने माझी अवस्था काय झाली असेल, याचा विचार करुच शकता. “मोदीजी, हे इंजेक्शन कसले आहे? यात कोणकोणते प्राणी आहेत हेच मला समजत नाही. मला झोप येत नाही. माझे डोळे सुजले आहेत. माझा चेहराही सूजला आहे. हे व्हायग्रा आणि वासनेचे इंजेक्शन आहे”, असेही राखी म्हणाली. त्यासोबतच तिने हे इंजेक्शन न घेण्याचा सल्ला दिला.

 दरम्यान राखी सावंतने दोन दिवसांपूर्वीच करोनापासून बचाव करण्यासाठी बूस्टर डोस घेतला होता. याचा एक व्हिडीओही तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. यानंतर आता राखीने पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

 

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा