अखेर आत्महत्येचे गूढ उकलले
औरंगाबाद/ प्रतिनिधी - रविवारी रात्री 11.30 वाजता समर्थ नगर मध्ये एका युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. परंतु आत्महत्येचे गूढ मात्र कायम होते.
रोहन जामा पाटील (२४, रा. वडगाव, ता. रावेर, जि. जळगाव, गुरुकृपा बिल्डिंग,समर्थ नगर) याने रविवारी रात्री भाड्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. रोहन ने चार पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. यात त्याने माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये असे म्हटले आहे. त्या शिवाय माझा खूप विश्वास होता, पण माझा विश्वास घात झाला. काय कारण होतं ते कळलच नाही. माझं काय चुकलं ते सांगायचं होतं. शेवटी तुझा निर्णय आहे पण मरण्या अगोदर एक सांगतो आयुष्यात तुझं कधी चांगलं होणार नाही. असे लिहून ठेवले आहे रोहन हा एम.पी. लॉ. महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकत होता.