कामगार एकता संघटनेकडून आमरण उपोषण

कामगार एकता संघटनेकडून आमरण उपोषण

औरंगाबाद / प्रतिनिधी - सिडको कालीन बचत गट कामगार, सिडको कालीन माळी कामगार, रेड्डी कंपनी कडील वाहन चालक, घंटागाडी कामगार, औषध फवारणी कामगार व शिक्षण विभाग, यांत्रिकी विभाग, पाणीपुरवठा या विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या  कामगारांना किमान वेतन 24 फेब्रुवारी 2015 नुसार मिळत नसल्यामुळे कामगार एकता संघटनेतर्फे महापालिका मुख्य कार्यालयासमोर दिनांक 23 जून पासून  कामगार एकता संघटनेकडून आमरण उपोषण केले जात आहे.

महानगरपालिकेतर्फे 2000 ते 2500 कामगार अनेक विभागात काम करत आहेत पण त्यांना महाराष्ट्र शासन किमान वेतन कायदा महानगरपालिका क्षेत्रात काम करणारे कामगार कर्मचाऱ्यांना २४ फेब्रुवारी २०१५ नुसार किमान वेतन निश्चिती करावी यासाठी मनपा प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा कामगारांना न्याय मिळत नाही, कामगारांना काम करून सुद्धा अर्धपोटी राहुन जीवन जगावे लागत आहे,  महानगरपालिका आस्थापनेवर पूर्ण सर्विस सफाई मजूर म्हणून काम केलेले असताना सुद्धा त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या वारसांना त्यांच्या जागेवर नोकरी देताना त्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना सफाई म्हणून  ऑर्डर न देता फक्त मजूर म्हणून उल्लेख करण्यात येत आहे तरी या कर्मचाऱ्यांना शासन नियमानुसार सफाई मजूर म्हणून ऑर्डर मध्ये उल्लेख करण्यात यावा संबंधित व प्रशासन यांच्या संगनमताने कामगारांवर राजरोसपणे अन्याय करत आहेत या अन्यायाच्या विरोधात लोकशाही मार्गाने कामगार संघटनेच्या वतीने महानगरपालिका मुख्य कार्यालयासमोर दिनांक 23 जून पासून आमरण उपोषण केले जात आहे.

कामगार संघटनेच्या मागण्या
सिडको कालीन साफसफाई कामगारांना सन २०१८ च्या सर्वसाधारण सभेमध्ये ठराव क्रमांक १३४४ नुसार थकीत ६ महिन्याचे वेतन फरक व महागाईबद्दल रुपये ६६५० ची वाढ झाली आहे ती तात्काळ लागू करावी.

सिडको कालीन माळी कामगारांचे थकलेले १७ महिन्याचे वेतन तात्काळ देण्यात यावे.

रेडी कंपनीकडे काम करणाऱ्या घंटागाडी कामगार व वाहन चालक यांना प्रशासनाने दिनांक २१/२/२०२२ रोजी मिटिंग मध्ये ठरल्याप्रमाणे दोन महिन्यात दिनांक 24 फेब्रुवारी 2015 चा अधिनियमानुसार (ग्रामपंचायत वगळून) किमान वेतन वाढ तात्काळ लागू करावी.

महानगर पालिका आस्थापनेवर सफाई मजूर म्हणून काम करत असलेले कर्मचारी   सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या वारसांना नोकरी देताना सफाई मजूर म्हणून उल्लेख करावा.

जय दुर्गा महिला बचत गट ठेकेदाराकडे  सिडको कालीन कामगारांचे दोन महिन्यांचे वेतन तात्काळ अदा करावे थकलेले पीएफ ची रक्कम वसूल करावी.

सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना वार्षिक २४  पेड सुट्ट्या मिळणेबाबत.

प्रोप्रा गोपीनाथ रेड्डी कंपनीकडे विनाकारण किरकोळ कारणावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना त्वरित कामावर रुजू करून घ्यावे.

सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना पेमेंट स्लिप देण्यात यावी.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा