हिंदू समाजावर होणाऱ्या अन्याया विरोधात औरंगाबादमध्ये मूकमोर्चा

औरंगाबाद /प्रतिनिधी - देशामध्ये व महाराष्ट्रामध्ये सकल हिंदू समाजावरती होणाऱ्या अन्याया विरोधात आज औरंगाबाद शहरात  पैठण गेट ते औरंगपुरा या मार्गे भव्य मूक मोर्चा काढण्यात आला होता.


 या मोर्चामध्ये हिंदू विचारी संघटना मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. देशामध्ये व महाराष्ट्रामध्ये हिंदूंवरती होणाऱ्या अन्याय विरोधात व तसेच जिहाद विरोधात सकल हिंदू समाज नेहमी बोलत असतो. तरी देखील हिंदू समाजावरती अन्याय कमी होत नाही."जो हिंदू हितकी बात करेगा वही देश मे राज करेगा" असे नाम फलक घेऊन मोर्चामध्ये तरुण तरुणी  सहभागी झाले होते. मोर्चात सहभागी लोकांनी भगवी टोपी धारण करून भगवे झेंडे  हातात घेतले होते त्यामुळे पैठण गेट ते औरंगपुरा परिसर भगवामय झालेला दिसून आला.

हिंदू समाजाच्या अन्यायाविरोधात निघालेल्या मोर्चामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा देखील सहभाग होता. भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर देखील मोर्चात सहभागी झाले होते.
तसेच मोर्चामध्ये शैलेश फटके, मेटे महाराज, कपाटे महाराज, संजय बारगजे, अभिषेक कादि, सुभाष मोकारिया, चंदा राजपूत, विजया अवस्थी, चैतन्य यादव, रवी मिसाळ, शालिग्राम बसैये, राजू जागीरदार, उमेश जागीरदार यांचाही सहभाग होता.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा