मनपा आयुक्तांच्या आदेशाला  केराची टोपली पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाई अपूर्णच

औरंगाबाद / प्रतिनिधी - मनपा आयुक्तांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाई चे काम पूर्ण करा असे आदेश मनपा अधिकाऱ्यांना दिले होते यावेळी अधिकाऱ्यांनी 80 टक्के नालेसफाई चे काम पूर्ण झाले आहे असे सांगितले परंतु वास्तवतेत दृष्य काही वेगळेच आहे. अजूनही काही भागातील नालेसफाई तशीच असल्याचे चित्र समोर आले आहे

दरवर्षीप्रमाणे पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील नाले सफाई करण्यात येते मात्र मागील वर्षीची परिस्थिती बघता यावर्षी मनपाने नालेसफाईच्या कामाला गती देण्याचे ठरवले आहे.यानुसार प्रशासक अस्तिक कुमार पांडे यांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना या संबंधित आदेश देखील दिले या बैठकीत अधिकाऱ्यांनी शहरातील 80 टक्के नालेसफाई झाले असल्याचे आयुक्तांना सांगितले. 31 मार्चपर्यंत नाले सफाई करण्याचे आदेश प्रशासकांनी दिले अजून काही दिवस शिल्लक असले तरी शहरातील नालेसफाईची परिस्थिती काहीशी वेगळी आहे.शहरातील काही भागातील नालेसफाई तशीच असल्याचं चित्र समोर  आलं आहे. नाल्यातील कचरा तसेच गाळ तसाच पडून आहे येथे कुठलेही नालेसफाई झाली नाहीय. ही परिस्थिती कबाडीपुरा भागातीलच नाही तर अजुनही काही ठिकाणी नालेसफाई बाकी आहे त्यामुळे अधिकारी जरी म्हणत असले की शहरातील 80 टक्के नालेसफाई झाली आहे मात्र परिस्थिती काहीशी वेगळी आहे. यामुळे शहर तुंबण्याची शक्यता जास्त असते. या भागात दरवर्षी पाऊस झाल्यानंतर घरात पाणी शिरते यामुळे येथील नागरिकांचे हाल होतात याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा