वाळूज पोलिस निरीक्षकांचा स्तुत्य उपक्रम 

वाळूज पोलिस निरीक्षकांचा स्तुत्य उपक्रम 

वाळूज / प्रतिनिधी- एमआयडीसी वाळुज पोलिस निरीक्षकांच्या पुढाकारातून तसेच ममता मेमोरिअल मल्टीस्पेशालीटी व साई हास्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह वाळूज भागातील पत्रकारांसाठी मोफत आरोग्य शिबिर बुधवार दि. १५ ममता मेमोरिअल मल्टीस्पेशालीटी हास्पिटल येथे घेण्यात आले. याशिबीरात कान, नाक, डोळ्यांसह ह्रदय, हाडांची तपासणी करण्यात आली. तसेच तपासणीतून आवश्यक असलेल्या ईको टूडीसह   सिटी स्काॅन, सोनोग्राफी, 2P इको, ECG चाचण्यादेखील निशुल्क करण्यात आल्या. तसेच तपासणीस आलेल्या प्रत्येकाला हिप्टाटाईस बी लसीचेही मोफत लसीकरण करण्यात आले.
या आरोग्य शिबीरामध्ये पोलिस प्रशासन आणि पत्रकारांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावून शिबीराचा लाभ घेतला. यात ११० पोलिस कर्मचारी आणि २० पत्रकार अशा सुमारे १३० जणांनी या शिबीराचा लाभ घेतला. शिबीरास पोलीस उपायुक्त उज्वला वनकर,एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांच्या् हस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. शिबीरात सर्वच डॉक्टरांनी मोठ्या उत्साहाने सर्व तपासण्या  केल्या. ममता   मोरियल मल्टीस्पेशालीटीचे डॉ सुदाम चव्हाण MD (मेडीसिन) संचालक ममता मेमोरियल मल्टीस्पेशालीटी तसेच या शिबिराचे आयोजक डॉ. अमर कोडगिरे (बालरोग तज्ञ) डॉ. अनिल पवार (एम.डी. मेडीसिन) डॉ. नितीन चित्ते (चेस्ट फिजिशियन)  डॉ. राहुल फोलाने (हृदयरोग तज्ञ) डॉ. नेहा देशपांडे (नेत्ररोगतज्ज्ञ) डॉ. अक्षया जगताप (बालरोग तज्ञ) डॉ. प्रतिभा शितोळे (कान, नाक, घसा तज्ञ) डाॅ. क्रांती इंगळे (जनरल फिजिशियन) निकीता देशमाने (जनरल फिजिशिगन) डॉ. सुरेश मानकर(दंतरोग तज्ञ) डॉ. दिपेश जोगड ( रेडीयोलॉजिस्ट) डाॅ. दिनेश चव्हाण (होस्पीटल अॅडमेटेशन) आदी डाॅक्टरांनी या शिबिरासाठी परिश्रम घेतले. यावेळी ममता मेमोरियल मल्टीस्पेशालिटीचे संचालक डाॅ. सुदाम चव्हाण व साई हास्पिटलचे संचालक डॉ.  अमर कोडगिरे यांनी आरोग्य विषयी मार्गदर्शन करून, आरोग्याचे महत्व पटवून दिले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा