भाजप महिला आघाडी कडून मनपासमोर आंदोलन
औरंगाबाद /प्रतिनिधी : शहरात अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या मालमत्तेचे जे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे करून तत्काळ भरपाई देण्यात यावी या मागणी करीता भाजपा महिला आघाडी व जयभवानी नगर येथील नागरिकांच्या वतीने मनपासमोर आंदोलन करण्यात आले.
गेल्या अनेक दिवसांपासून शहरात सतत संततधार पाऊस पडत असून मंगळवारी रात्री आतिवृष्टी सारखा धो धो पाऊस झाल्याने शहरात अनेक सखोल भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. तसेच अनेक वाहने वाहून गेले यामुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. बहुतांश भागात रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाला होता. या काळात मनपा आपतकालीन कक्षाचे दूरध्वनी बंद होते यामूळे लोकांना संकटकालीन परिस्थिती चा सामना करावा लागला.
सर्व परिस्थिती पाहता शहरातील नागरिकांच्या झालेल्या नुकसानीचे मनपा प्रशासनाने रीतसर पंचनामे करून त्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी भाजपच्या महिला आघाडी च्या वतीने मागणी करण्यात आली आहे.
सदर निवेदन मनपा आतरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांना दिले असून त्वरित मागण्या पूर्ण करा अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा आंदोलन कर्त्या भाजपच्या शहर जिल्हा सचिव मनीषा मुढे वाघ यांनी प्रशासनाला दिला आहे. या आंदोलनात सविता मिसाळ, मिरा पठाडे,अनिता तुपे,कमला साठे, पूनम मोरे ,अनुसया लोखंडे, शारदा बोराडे, प्रथा वाहुल, सत्यभामा राऊत शोभा चव्हाण, निर्मला रोटे, सभा सरोज आदी महिला सह मोठ्या संख्येने जयभवानी नगर व भाजपा महिलां आघाडी ची उपस्थिती होती.