घरगुती वादातून पत्नीच्या डोक्यात घातले मुसळ व चाकूने भोसकले शेवटी फरार पती अटकेत
औरंगाबाद : घरगुती कारणावरून पत्नीच्या डोक्यात मुसळ मारल्यानंतर चाकूने भोसकून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न करून. आरोपी फरार झाला होता. या आरोपी नवऱ्याला चिखलठाणा पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 27 फेब्रुवारी रोजी पिसादेवी येथे घडली होती.
दीपक अर्जुन भांबळे, (वय 32) राहणार डोलखेडा जाफराबाद, जि.- जालना असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की आरोपी दीपक हा पत्नी अश्विनी आणि तीन वर्षाच्या मुलीचा पिसादेवी येथे राहतो .तो खाजगी फायनान्स कंपनीत नोकरी करतो 2016 साली त्यांच्या अश्विनी सोबत लग्न झाले. 27 फेब्रुवारी रोजी दारूच्या नशेत दिपकने पत्नीला फोन शिवीगाळ केली.
त्यानंतर तो घरी आला आणि त्याने आश्र्विनीला चालुके भोसलेने व हल्ला केला. अश्विनी कशीबशी बाहेर पडली. जवळच राहणाऱ्या मामाला येऊन घरी आली. पिशवीत कपडे भरू लागली तेव्हा दिपकने अश्विनीच्या डोक्यात मुसळ घालून तिला चाकूने भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.अश्विनीला नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले घटनेपासून फरार झालेला दिपकला चिखलठाणा पोलिसांनी अटक केली.