जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली किले-ए-अर्कच्या तटबंदीची पहणी
औरंगाबाद / प्रतिनिधी : शासकीय कला महाविद्यालय गेट (मीर आदिल दरवाजा) व त्या लगत असलेली किले-ए-अर्क ची तटबंदी नामशेष होण्याच्या मार्गावर होती. मात्र जिल्हाधिकारी यांच्या पुढाकारातून ही जागा "सिटी सेंटर" म्हणून विकसीत करण्यात येणार आहे. याचा वापर विविध लोक विविध प्रकारे उपयोगी करू शकतील जसे की ओपन एयर थीयएटर, विविध शिबिरे, कार्यशाळा, हेररटेज वॉक, रीहेसर्ल परेड, पोलीस बॅंड, एन.सी.सी परेड, शैक्षणिक मेळावे, इत्यादी यासारख्या सामाजिक कार्यासाठी सिटी सेंटर उपयोगी ठरणार असून यात अंदाजे 6 हजार प्रेक्षक बसू शकतील.
पालकमंत्री सुभाष देसाई यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी त्यांचे आभार मानले.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या कामाची पहाणी करत गुणवत्तापूर्ण काम करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या. यावेळी त्यांच्या सोबत उपविभागीय दंडाधिकारी स्वप्नील मोरे उपस्थित होते.