खिवंसरा मध्ये प्रेक्षकांचा हिरमोड शेवटी डिझेल मिळालेच नाही तिकिटाचे पैसे परत
औरंगाबाद / प्रतिनिधी : येथील वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या शेजारी अस्नर्या खिवंसरा सिनेमा येथे शुक्रवारी पिक्चरचा शो चालू असताना अचानक अर्ध्यामध्ये मूव्ही बंद पडला. यावेळी अर्धा तास शो बंद होता. त्यानंतर प्रेक्षकांना पैसे परत करण्यात आले.
काल सुट्टी असल्याने एमआयडीसीतील कामगार वर्ग 12 ते 13 चा शो पाहण्यासाठी गेले होते. काल शुक्रवार असल्याने महावितरणचा मेंटेनन्स डे होता त्यामुळे लाईट केली व शो बंद पडला. यावेळी शो अर्ध्यात बंद पडल्याने प्रेक्षकांचा हिरमोड झाला. डिझेल संपल्याने शो बंद पडल्याची माहिती मिळत आहे. यानंत बराच वेळ प्रेक्षकांनी वाट पाहिली मात्र अर्धा शो पाहून प्रेक्षकांना घरी परतावे लागले.