मिसारवाडीत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

मिसारवाडीत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

औरंगाबाद/प्रतिनिधी
मिसारवाडी येथील महानगर पालिका शाळेत जागतिक महिला दिन  उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात नगरसेविका संगिता सुभाष वाघुले यांनी महिलाचा सत्कार केला़.
 कोरोनाच्या कठीण प्रसंगात शिक्षक महिला,आरोग्य  विभागातील महिलांचे मोठे योगदान होते. महिलाच्या या कामाची दखल घेवून नगरसेविका संगीता सुभाष वाघुले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच खा. इम्तियाज जलिल यांच्या मातोश्री जकीया सय्यद अब्दुल जलील यांनी लहान मुली मुलांच्या शिक्षणासाठी खुप मोठे काम केले आहे या विषयी नगरसेविका संगीता वाघुले यानी माहिती दिली. तसेच मिसारवाडीतील नागरीकांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली  देण्यात आली.या वेळी आदर्श शिक्षक  मराठवाडा शिक्षण मडळ वदोद कान्होबा येथील सुरेखा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती तर वाडार्तील जेष्ठ नागरिकसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमांचे आयोजक मनपा शाळाच्या मुख्यध्यापिका एस.पी. जोगदंड यानी सर्वाचे आभार व्यक्त केले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा