कोविड काळात शिवसेनेचे कार्य कौतुकास्पद - चंद्रकांत खैरे

कोविड काळात शिवसेनेचे कार्य कौतुकास्पद - चंद्रकांत खैरे

औरंगाबाद / प्रतिनिधी : गेल्या २ वर्षात कोविड काळात शिवसेनेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले. तीसगाव वाळूज महानगर येथे रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिरात त्यांनी केले.


    तिसगावचे उपरपंच तथा उपविभागप्रमुख नागेश कुठारे आयोजित श्री स्वामी समर्थ मंदिर, म्हाडा काॅलनी सिडको वाळूजमहानगर -१  तिसगाव येथे स्वामी समर्थ महाराज यांची महाआरती केली. यावेळी सामाजिक उपक्रम रक्तदान शिबीर महिलांचे एच. बी. तपासणी,रक्तगट तपासणी, मोफत श्रम कार्ड, नेत्र तपासणी शिबिर तसेच कोविड लसीकरण या विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले होते.
 याप्रसंगी माजी जि. प. सदस्य रामचंद्र कसुरे, ज्ञानेश्वर शितलंबे, तिसगाव ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब बुटटे, संजय जाधव, प्रविण हांडे, गणेश बिरंगळ, सुदाम जाधव, नरेंद्र यादव, शितल गंगवाल, प्रताप भवर, तेजस बडे, अनिल पवार, राजेश सिंग, गंगाराम मालकर, रवि हजारे, पाटील जगन्नाथ, चौधरी सुशांत, संभाजी भोसले, श्रीधर गेंदाळे, उपस्थित होते या प्रसंगी ४३  रक्तदात्यांनी रक्तदान केले,५१ श्रम कार्ड नोंदणी करण्यात आली. ४२ कोविड लसिकरण करण्यात आले, ७३ नागरिक यांनी नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच महिलांनी एच बी तसेच रक्तगट तपासणी करून या सेवेचा फायदा घेतला.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा