महागाई विरोधात युवासेनेचे थाळी नांद आंदोलन

महागाई विरोधात युवासेनेचे थाळी नांद आंदोलन

सिल्लोड / प्रतिनिधी : केंद्रातील भाजप सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस, तेल यासह जीवनावश्यक वस्तूंचे केलेल्या भरमसाट दरवाढीविरोधात युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या आदेशानुसार, महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात युवासेनेच्या वतीने थाळी नांद आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शिवसेना - युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकदेखील सहभागी झाले होते. "थाली बजाओ, खुशीयाँ मनाओ " अशी मिश्किल घोषणाबाजी करीत युवासैनिकांनी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. 

 केंद्रातील भाजप सरकारने इंधनासह जीवनावश्यक वस्तूंचे भरमसाट दरवाढ केल्याने सर्वसामान्य जनता हवालदिल झाले आहे. दिवसागणिक केंद्र सरकार जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवीत आहे. गेल्या दोन वर्षातील कोरोनाचे संकट, अतिवृष्टी अशा आस्मानी संकटात सामान्यांच्या हाताला काम नाही . यात दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकारकडून इंधन व जीवनावश्यक वस्तूंची होणारी दरवाढ निषेधार्थ असून युवासेनेच्या वतीने या दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यात येत असल्याचे युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर म्हणाले. केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंचे दरवाढ कमी करावी नसता याहून अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

यावेळी युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, युवासेना जिल्हाप्रमुख कैलास जाधव, नगराध्यक्षा श्रीमती राजश्रीताई निकम, जि.प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, शिवसेना विधानसभा संघटक सुदर्शन अग्रवाल, शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, युवासेनेचे पदाधिकारी शेख इमरान ( गुड्डू ), लखन ठाकूर, अक्षय मगर, धैर्यशील तायडे, शिवा टोम्पे, बापू काकडे, प्रवीण मिरकर, रवी गायकवाड, गौरव सहारे, संग्राम राजपूत, अमोल कुदळ, सुनील सनान्से, योगेश शिंदे, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, मतीन देशमुख, सुनील दुधे, प्रशांत क्षीरसागर, बबलू पठाण, नॅशनल सुत गिरणीचे संचालक मारुती पा. वराडे, अमृतलाल पटेल, पालोद सरपंच नासेर पठाण, उपसरपंच मॅचिंद्र पालोदकर, रमेश पालोदकर, माजी नगरसेवक सुशील गोसावी, अस्लम मुलतानी, एकनाथ शिंदे, फहिम पठाण, संदीप हाडोळे, सुभाष जाधव, स्वप्नील शेळके, आशिष कुलकर्णी, संदीप पाटील, गणेश डकले, समाधान साळवे, दीपक वाघ, प्रा. समाधान गायकवाड, कैलास इंगे, शेख गफ्फार, गुलाब मिरगे, जगन्नाथ कुदळ, आनंद सिरसाट, वैभव बन्सोड, अमोल शिंदे, प्रभाकर बनसोडे, रमेश शिंदे, काकाजी शिंदे, हरिकीसन शिंदे , लहू शिंदे आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा