वडगाव कोल्हाटी - बजाजनगर निवडणुकीत आमदार संजय शिरसाट गटाचे वर्चस्व
औरंगाबाद /प्रतिनिधी - वडगाव कोल्हाटी बजाज नगर निवडणुकीचे निकाल सध्या सुरू आहेत. या निवडणुकीत आमदार संजय शिरसाट यांच्या गटाचे वर्चस्व दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक एक मधील तीन आणि प्रभाग क्रमांक दोन मधील दोन उमेदवार आत्तापर्यंत विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे या निवडणुकीत आमदार संजय शिरसाठ यांच्या गटाचे वर्चस्व दिसून येते.
वडगाव कोल्हाटी बजाजनगर ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्यक्षात चौरंगी लढत झाली. त्यामध्ये आ . संजय शिरसाट यांच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ग्रामविकास पॅनलने प्रचारक आघाडी घेतली होती आज त्यांच्या पॅनलचे प्रभाग क्रमांक एक मधील सुनील काळे, सुनीता राजेश साळे आणि छायाताई सोमीनाथ प्रधान हे विजय झाले आहेत तर प्रभाग क्रमांक दोन मधील विष्णू उगले आणि माधुरी राजन सोमासे हे विजयी झाले. आहेत 17 जागांपैकी सध्या पाच जागा या आमदार संजय शिरसाट यांचा गटाच्या विजयी झाले आहेत सध्या मतमोजणी सुरू आहे