नवाब मलिकांचा तुरुंगातील मुक्काम 2 आठवड्याने वाढला

नवाब मलिकांचा तुरुंगातील मुक्काम 2 आठवड्याने वाढला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्यांक विकासमंत्री नबाव मलिक यांना सक्त वसुली संचालनालयाने अटक केली आहे. यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. मलिक हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत न्यायालयाने 18 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. यामुळे मलिक यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी दोन आठवडे वाढला आहे. 

गँगस्टर दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरला मालमत्तेसाठी मलिक यांनी पैसे दिले. पारकरने ते दाऊद इब्राहिमला दिले, असा दावा करत हे 'टेरर फंडिंग` असल्याचा आरोपी ईडीने केला आहे. ईडीने अटक केल्यानंतर कार्यालयातून बाहेर पडताना मलिक यांनी `नही झुकेंगे और भी लढेंगे, सबको एक्सपोज कर देंगे` अशी प्रतिक्रिया दिली होती.

मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्यांची मागणी केली आहे. तर महाविकास आघाडी सरकारने मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे. मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 18 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा