पाण्यासाठी भाजपा पदाधिकारी ' जल श्री ' वर धडकले
औरंगाबाद/प्रतिनिधी
उन्हाने शरीराची लाही लाही होत असतानाच पाणीटंचाईचा सामना करत असणारे नागरिक आणि त्यांचा कळवळा असणारे भाजपाचे आमदार अतुल सावे आणि त्यांचे कार्यकर्ते हे जलश्री वर जाऊन धडकले मोठ्या अपेक्षेने गेलेल्या भाजपाच्या तोंडाला मनपा आयुक्तांनी पाने पुसून परत पाठवले.
औरंगाबाद शहरात सध्या पाणी टंचाई भासत आहे. पाण्यासाठी भाजपाचे आ. अतुल सावे यांच्या नेतृवात पाण्याच्या टाकीवर आंदोलन सुरू केले होते मात्र कोणीच लक्ष देत नसल्यामुळे सावे यांनी आपला मोर्चा महापालिका आयुक्त यांच्या निवास स्थान जलश्री बंगल्यावर गेले या ठिकाणी आयुक्तांनी चर्चा करून भाजपा च्या तोंडाला पाने पुसल्याची चर्चा समोर आली आहे. भाजपने पाण्यासाठी आंदोलन केले मात्र यावेळी त्यांनी पाण्याचे टँकर बंद केल्यामुळे अनेक नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे आजच्या आंदोलनाने भाजपने काय साध्य केलं अशी चर्चा नागरिकांमध्ये होती.