महापालिकेची नायलॉन माजा विरुद्ध कारवाई
औरंगाबाद/प्रतिनिधी
औरंगाबाद महापालिका घनकचरा व्यस्थापन विभाग, नागरी मित्र पथकात आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याचे अधिकारी कर्मचारी यांनी संयुक्त रित्या शहरातील राजाबाजार ,जुनाबाजार बुद्दी लाईन परिसरातील असलेल्या पतंग दुकानात छापा मारून प्लस्टिकचे पतंग आणि शासनाने निर्बध केलेला नायलॉन माजा यांच्या दुकानाची झडती घेत ,प्लस्टिक पणीची पतंग जप्त करत अनेक दुकानदारावर दंडात्मक कारवाई करून माजा आणि पतंग जप्तीची कारवाई केली.
महानगरपालिकेचे उपायुक्त सौरभ जोशी , महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डॉ. प्रविण जोशी, उपप्रादेशिक अधिकारी प्रदीप वानखेडे, उपप्रादेशिक अधिकारी पद्माकर हजारे, क्षेत्रीय अधिकार सीमा मांगुळकर, महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वच्छता निरीक्षक विशाल खरात, नागरीक मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव,व कर्मचारी आदी चा या कारवाईत समावेश होता.