इमारतीला भीषण आग१४ जणांचा होरपळून मृत्यू

इमारतीला भीषण आग१४ जणांचा होरपळून मृत्यू

झारखंड :  धनबादमधील इमारतीला मंगळवारी संध्याकाळी उशिरा भीषण आग लागली. या आगीत होरपळून १० महिला, ३ मुलांसह एकूण १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. 

एएनआयच्या वृत्तानुसार, झारखंडमधील धनबाद येथील टॉवरला लागलेल्या आगीत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्य सुरू आहे. शहरातील बँक मोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शक्ती मंदिराजवळील टॉवरला मंगळवारी संध्याकाळी उशिरा भीषण आग लागली. 

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, आग काही वेळातच सर्वत्र पसरली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान बंबांसह घटनास्थळी पोहोचले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. या इमारतीत नेमके किती रहिवासी अडकले आहेत, याची निश्चित माहिती समजू शकलेली नाही. 

मृत्यू झालेले अनेक जण कार्यक्रमासाठी आले होते.... 

या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर १२ जण जखमी झाले आहेत. या इमारतीत एका कार्यक्रमासाठी काही लोक आल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. आम्ही सध्या बचावकार्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत, असे धनबादचे एसएसपी संजीव कुमार यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री सोरेन यांनी व्यक्त केलं दुःख 

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या आगीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांप्रती दुःख व्यक्त केलं. आगीत जखमी झालेल्यांना तात्काळ उपचार मिळावेत, यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे, असे मुख्यमंत्री सोरेन यांनी सांगितले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा