टीव्हीएस ने आनली नवीन ज्युपिटर सीएनजी स्कूटर
भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 ची सुरुवात चांगली झाली आहे. या निमित्ताने TVS ने आपली नवीन ज्युपिटर CNG स्कूटर लॉन्च केली. ही स्कूटर भारतीय टू-व्हीलर बाजारात नवीन क्रांती आणणार आहे.
आतापर्यंत फक्त सीएनजी बाईक उपलब्ध होत्या, परंतु ही देशातील पहिली स्कूटर आहे जी सीएनजी आणि पेट्रोल या दोन्हीवर चालेल.
डिझाइन आणि परफॉर्मेंस
टीव्हीएस ज्युपिटर सीएनजीची डिझाइन 125 सीसी पेट्रोल मॉडेलसारखीच आहे. परंतु सीएनजीला लक्षात घेऊन त्यात काही खास बदल करण्यात आले आहेत. यात 1.4 kg CNG टँक आणि 2-लीटर पेट्रोल टँक आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, ही स्कूटर 1 किलो सीएनजीमध्ये 84 किलोमीटरचे मायलेज देईल आणि एकदा पेट्रोल टँक भरली की ती 226 किलोमीटरपर्यंत धावू शकेल.
पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाले तर ज्युपिटर CNG ला OBD2B कंप्लायंट इंजिन देण्यात आले आहे. यात 125 cc बायो-इंधन इंजिन आहे. जे 600 rpm वर 5.3 kW चा पॉवर आणि 5500 rpm वर 9.4 Nm टॉर्क देते.
ज्युपिटर CNG ची फीचर्स
ज्युपिटर सीएनजीमध्ये नवीन आणि स्मार्ट फीचर्स देण्यात आले आहेत. यात एलईडी हेडलाइट्स, यूएसबी चार्जर, स्टँड कट ऑफ आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सारखी फीचर्स आहेत. ही स्कूटर खास इको-फ्रेंडली आणि फ्यूल सेव्हिंगसाठी तयार तयार करण्यात आली आहे.
ज्युपिटर सीएनजीची अपेक्षित किंमत
सध्या, TVS ज्युपिटर 125 च्या पेट्रोल व्हर्जनची किंमत व्हेरिएंटनुसार 88,174 ते 99,015 रुपयांच्या दरम्यान आहे. असे मानले जाते की, त्याचे नवीन सीएनजी व्हर्जन देखील त्याच रेंजमध्ये, म्हणजेच 90,000 ते 99,000 रुपयांच्या दरम्यान लॉन्च केले जाईल. मात्र, त्यात सीएनजी टँक असल्याने बूटची स्पेस थोडी कमी असू शकते.