Zilla Parishad Aurangabad : औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणूक आरक्षण जाहीर, महिलांसाठी 35; तर ओबीसींसाठी 18 जागा राखीव
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या (zilla-parishad ) आरक्षणाची सोडत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत 70 गटांचे आरक्षण (70 Groups) काढण्यात आले. ओबीसीसाठी 18, अनुसूचित जाती - 9, अनुसूचित जमाती - 4 आणि खुल्या प्रवर्गासाठी 39 गट असणार आहे. तर, महिलांसाठी ३५ गट राखीव आहेत.
महिलांसाठी 35 जागांवर आरक्षण
औरंगाबाद जिल्ह्यात यापूर्वी जिल्हा परिषदेचे 62 गट होते. आता ही संख्या 70 झाली आहे. या 70 गटात महिलांची संख्या 35 असणार आहे. या 35 महिलांमध्ये ओबीसींच्या 9 महिला, अनुसूचित जातीसाठी 5 तर, अनुसूचित जमातींसाठी 2 आणि खुल्या गटात 19 महिला असणार आहेत.
हे आहेत गट
अनुसूचित जातीच्या 9 पैकी पाच गट महिलांसाठी राखीव आहेत. यामध्ये जेहूर, बालानगर, गदाना, गोंदेगाव, बाबरा हे पाच गट अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव आहेत.
तर, अनुसुचित जमातीमध्ये चार पैकी दोन महिला गट राखीव आहेत. यामध्ये कुंजखेडा,संवदगाव यांचा समावेश आहे. ओबीसींच्या १८ पैकी ९ गट महिलासाठी राखीव आहेत. यामध्ये डोंगरगाव, डावलवाडी, भराडी, अंधारी, पळशी, भवन, हतनूर, वाकला शिवूर हे गट आहेत.
तर सर्वसाधारण महिलांसाठी १९ गट राखीव आहेत. यामध्ये शिवना, नागद, चिंचोली लिंबाजी, पाल, बाजारसावंगी, लाडगाव, चोरवाघलगाव, महालगाव, अनंतपुर(सावंगी), शेंदुरवाद, लाडसावंगी, गोलटगाव, वडगाव कोल्हाटी, पंढरपुर, आडगाव. बु.,पिंप्री, पाचोड पिंपळवाडी पिराची यांचा समावेश आहे.