प्रभाग क्रमांक तीन मध्ये तीन पॅनलचे तीन विजयी
औरंगाबाद प्रतिनिधी
वडगाव कोल्हाटी बजाजनगर प्रभाग क्रमांक तीन मध्ये मतदारांनी धक्कादायक निर्णय दिल्याचे समोर येत आहे. तीन पॅनलच्या वेगवेगळ्या तीन उमेदवारांना मतदारांनी विजयी केले आहे.
प्रभाग क्रमांक तीन मध्ये चौरंगी लढत झाली होती. मतदारांनी विचार करून यामध्ये सेनेच्या निष्ठावंत पॅनलचे उमेदवार सागर शिंदे, भारतीय भारतीय जनता पार्टीचे परिवर्तन पॅनल च्या उमेदवार माया सतीश पाटील आणि आमदार संजय शिरसाठ यांच्या पॅनलचे राणी राम पाटोळे यांना विजयी करत मतदारांनी सर्व पॅनलला एक एक जागा देऊन विजय केले आहे. शिवशाही निष्ठावंत पॅनलचे आणि भारतीय जनता पार्टी पॅनलचे आठ जागांमध्ये पहिल्यांदा खाते उघडले आहे.