ॲड. सदाशिव गायके यांच्या हाती आता राष्ट्रवादीचे घड्याळ

ॲड. सदाशिव गायके यांच्या हाती आता राष्ट्रवादीचे घड्याळ

 ॲड. सदाशिव गायके यांचा भाजपला जय श्रीराम
        राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
औरंगाबाद/ प्रतिनिधी - गंगापुर तालुक्यातील दिनवाडा येथील रहिवासी तसेच जिल्ह्यातील राजकीय प्रस्थ असलेले सदाशिव गायके यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे गंगापूर तालुक्यातील राजकीय गणिता सह औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाला याचा फायदा होणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत आहे.
      सदाशिव अंबादास राव गायके हे गंगापुर तालुक्यातील दिनवाडा येथील रहिवासी आहे गेले अनेक वर्ष त्यांनी गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून कार्य केलेले आहे तसेच महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या प्रदेश सचिव म्हणून त्यांना कामाचा अनुभव आहे औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे ते जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सदस्य असताना त्यांनी बँकेतील नोकर भरती घोटाळ्याला सर्वांसमोर आणून या घोटाळ्यातील आरोपींना न्यायालयात उभे केले होते त्यामुळे सदाशिव गायके यांच्या कामाची छाप जिल्ह्यांनी बघितलेली आहे मागील काही दिवसांपूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता मात्र आता त्यांनी भारतीय जनता पार्टीला जय श्रीराम करत राष्ट्रवादीचे घड्याळ आपल्या हाती बांधले आहे. मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत आपल्या काही कार्यकर्त्यांसह ॲड. सदाशिव गायके यांनी बुधवारी दुपारी ( 25 मे   ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.  यामुळे गंगापूर तालुक्यातील राजकारणासह जिल्हाभरातील राजकारणात अनेक बदल होतील. अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्याबद्दल त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव शेख मसूद, खालेद जहागीरदार, अशोक बन्सवाल, ॲड. रोडगे पाटील,  ॲड. विजय गायके, मुशाहेद सिद्दिकी यांच्या अनेकांनी अभिनंदन केले आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा