एसटी महामंडळाच्या तिजोरीत तब्बल 28 लाख रुपये

00:00
00:00

औरंगाबाद / देव राजाळे

आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र शेड उभारण्यात आले होते. या भाविकांची संख्या लक्षात घेता औरंगाबादच्या शेडपासूनच पंढपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या मध्यवर्ती बसस्थानकातून ३२ जादा बस सोडण्यात आल्या होत्या. या सर्व बसनी अवघ्या १२ दिवसांत २८ लाखांचे उत्पन्न एसटी महामंडळाच्या तिजोरीत टाकल्याची माहिती आगार व्यवस्थापक संतोष घाणे यांनी दिली.

जिल्ह्याभरातून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकाने ४ ते १५ जून दरम्यान भाविकांची ने-आण केली. या बारा दिवसांच्या कार्यकाळात ३२ बस  गाड्यांनी तब्बल २२९ फेऱ्या केल्या. विशेष म्हणजे यावेळेस मध्यवर्ती बसस्थानकातुन देखिल भाविकांसाठी गाड्या सुटत होत्या. औरंगाबाद विभागातील आठ ही आगारातून १५० जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्यापैकी मध्यवर्ती बसस्थानकातून ३२ बसेसचे पंढरपूरच्या यात्रेसाठी नियोजन करण्यात आले होते.

अवघ्या १२ दिवसात मध्यवर्ती बसस्थानकाने २८ लाख ४० हजार ८०७ रुपयांचे उत्पन्न एसटी महांमडळाच्या तिजोरीत भर पाडून दिले आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे आषाढी यात्रेच्या माध्यमातून एसटी महामंडळाला  कोट्यावधी रुपयांच्या उत्पन्नाचा फटका बसला होता. मात्र यावर्षी कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे यंदा आषाढीला जाणाऱ्या भाविकांची अलोट गर्दी वाढली होती. वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटी महांमडळाने ४५ भाविकांच्या समुहासाठी थेट गावातून बससेवा पुरविण्याची योजना हाती घेतली होती. नागरिकांच्या मागणीनुसार एसटी सेवाही उपलब्ध करून देण्यात आली. त्यालाही प्रवाशांचा  चांगला प्रतिसाद मिळाला. 

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा