मागणी मान्य करवून घेण्यासाठी टॉवरवर चढून केले आंदोलन
औरंगाबाद / प्रतिनिधी - सोळाशे दिवसांपेक्षा जास्त दिवस आंदोलन करून देखील आ. अतुल सावेंवर गुन्हा दाखल केला जात नाही.त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांची आमदारकी रद्द करावी, या मागणीसाठी दि.२८डिसेंबर रोजी संभाजी भोसले यांनी तहसील कार्यालया जवळील टाॅवरवर चढून आंदोलन केले.
आमदार अतुल सावे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांची आमदारकी रद्द करावी, या मागणीसाठी संभाजी भोसले यांनी टाॅवरवर चढून आंदोलन केले. आज मंगळवारी तहसिल कार्यालयाजवळ ही घटना घडली.
पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी समजूत काढल्यावर आंदोलनकर्त्याने आंदोलन मागे घेतले. त्यांनी टाॅवरवर साधारण तीन तासांपेक्षा अधिक वेळ आंदोलन केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना भोसले म्हणाले, की सर्वसामान्यांच्या वतीने विधानसभा अध्यक्ष यांना सावे यांच्याविरुद्ध पुरावे पाठविले आहे. त्यांना निलंबित करावे. पुरावे सिद्ध झाल्यास आमदार अतुल सावे यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी संभाजी भोसले यांनी केली आहे.
माझ्याविरुद्ध सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मी गुन्हेगार नाही. सोळाशे दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत मी आंदोलन करतो आहे. तरी आ. सावेंवर गुन्हा दाखल झालेला नाही. मागणी पूर्ण झाली नाही तर आता हे तर ट्रेलर आहे, पुढे काय होईल ते पाहा, अशा इशारा संभाजी भोसले यांनी दिला आहे.