अनन्या पांडेनं आदित्य रॉय कपूरसोबतच्या नात्यावर सोडलं मौन, म्हणाली…
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनन्याने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ७’मध्ये हजेरी लावली होती. या आधी अनन्या पांडे मागच्या काही काळापासून तिच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे चर्चेत आहे. अनन्या पांडे मागच्या काही काळापासून आदित्य रॉय कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. करण जोहरच्या शोमध्ये अखेर या सर्व चर्चांवर अनन्याने मौन सोडलं आहे. अनन्याने तिच्या लव्ह लाइफबद्दल बिनधास्त गप्पा मारल्या आणि आदित्यसोबतच्या नात्याचा खुलासा केला आहे.
करण जोहरच्या शोमध्ये कलाकार आपले खासगी आयुष्य, प्रेम आणि जवळच्या मित्रांशी संबंधीत खुलासे करताना दिसतात. विशेषतः करणच्या शोमध्ये अनेकदा खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे होतात. ७ व्या सीझनमध्येही आतापर्यंत अक्षय कुमार, सारा अली खान, जान्हवी कपूर आणि समंथा सारख्या कलाकारांनी हजेरी लावली आहे आणि त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.