दर्गा हजरत सय्यद सादात यात्रा महोत्सव समिती अध्यक्षपदी ललित राऊत

दर्गा हजरत सय्यद सादात यात्रा महोत्सव समिती अध्यक्षपदी ललित राऊत

औरंगाबाद / प्रतिनिधी  : वाळूज येथील हिंदू , मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असलेले हजरत सादत साहेब यांच्या संदल निमित्ताने दर्गा परिसरात संदल महोत्सव साजरा करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली. या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ललित राऊत तर सचिवपदी तोफिक पटेल यांची निवड करण्यात आली.


      संदल महोत्सवामध्ये यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यात कव्वाली मुकाबला, कुस्ती स्पर्धा , कब्बडी स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजन करण्याचे ठरले. 
यावेळी  सय्यद सादात दर्गा वंशपरंपरागत मुतवल्ली इर्शाद इनामदार व सर्व वंशपरंपरागत खिदमतगार सलीम इनामदार,जावेद इनामदार,अर्षद इनामदार सर्व इनामदार तसेच उत्सव समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष ललित राऊत उपाध्यक्ष सचिन जमधडे, रमेश अरगडे (ग्रा.प.सदस्य जोगेश्वरी),सचिव तोफिक पटेल (ग्रा.प.सदस्य),कार्याध्यक्ष अविनाश गायकवाड (सभापती गंगापूर पंचायत समिती), कोषाध्यक्ष हाफिज पटेल, सरचिटणीस नियाज पटेल, संघटक काकासाहेब चापे पाटील (ग्रा.प.सदस्य ), सल्लागार नंदू राऊत (मा.ग्रा.प.सदस्य), दयानंद साबळे(ग्रा.प.सदस्य), शेख जमील अहेमद (ग्रा.प.सदस्य), सजेर्राव भोंड(मा. सरपंच वाळूज), अनिल साळवे(मा. ग्रा.प.सदस्य), तांत्रिक सल्लागार रतन अंबिलवादे , फैयाज कुरेशी (ग्रा.प.सदस्य), राउफ भाई,आरिफ टेलर,खालेद शेख, सद्दाम शेख, मातीनं शेख, अरबाज शेख, जुनेद शेख, आवेज शेख, अफजल शेख, जावेद इनाम इनामदार  आदीसह समस्त गावकरी उपस्थित होते.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा