आता नागराज मंजुळे यांच्या नावासमोर लागणार 'डॉक्टर'

आता नागराज मंजुळे यांच्या नावासमोर लागणार 'डॉक्टर'

मुंबई / प्रतिनिधी : मराठी इंडस्ट्रीसह बॉलिवूड इंडस्ट्रीला भुरळ घालणारे नागराज मंजुळे हे एक कवी, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते अशी त्यांची ओळख आहे. त्यांना डी वाय पाटील विद्यापीठाकडून 'डॉक्टर ऑफ लेटर्स' ही मानद पदवी बहाल करण्यात आली आहे. म्हणून आता त्यांच्या नावासमोर डॉक्टर लागणार आहे. 

त्यांना चित्रपट क्षेत्रातील अभूतपूर्व योगदानाबद्दल ही पदवी देऊन गौरविण्यात आला आहे. नागराज यांचे मित्र प्राध्यापक हनुमंत लोखंडे यांनी फेसबुक पोस्ट द्वारे ही माहिती दिली आहे सोबत डॉक्टरेट पदवी स्वीकारतानाचे नागराज यांचे काही फोटो शेअर केले आहेत.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा