हनुमान जन्मोत्सव पाच लाख भाविकांनी घेतले श्री भद्रा मारुतीचे दर्शन

हनुमान जन्मोत्सव पाच लाख भाविकांनी घेतले श्री भद्रा मारुतीचे दर्शन

खुलताबाद/ प्रतिनिधी -  हनुमान जन्मोत्सवानिमित्त आज शनिवार रोजी राज्यभरातून आलेल्या जवळपास पाच लाख भाविकांनी येथील श्री भद्रा मारुतीचे दर्शन घेतले जय श्रीराम जय हनुमान भद्रा हनुमान की जय जय बजरंग बली अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण रत्नपुर शहर दणाणून गेले होते जन्म समयी  पहाटे शिवसेना नेते माजी  खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठु पाटील बारगळ,  ऋषीकेश खैरे,  अनिल  मकरिये मुख्य पुजारी रवींद्र जोशी,  हस्ते महाआरती व महाअभिषेक करण्यात आला.


श्री भद्रा मारूती च्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील काण्याकोपऱ्यातुन लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात.  जिल्हातुन पैठण, गंगापूर, कन्नड, सिल्लोड, सोयगाव,   अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर,शिर्डी, नेवासा, कोपरगाव,नासिक, जळगाव, या ठिकाणाहुन मोठ्या संख्येने भाविक मिरवणुकीने पायी दर्शनासाठी शुक्रवार रात्रीपासूनच येत होते भाविकांमध्ये मोठा उत्साह जाणवत होता जय श्रीराम जय हनुमान श्री भद्रा हनुमान की जय जय बजरंग बली अशा गगनभेदी जय घोष भाविक करत होते शुक्रवारी मध्यरात्री लागलेल्या दर्शन रांगा शनिवारी रात्री उशिरापर्यंत कायम होत्या पायी येणाऱ्या भाविकांसाठी सर्वच मार्गांवर विविध ठिकाणी हा फराळ थंडपेय यांची व्यवस्था भाविकांच्या वतीने करण्यात आली होती संस्थान परिसरातही फराळ शुद्ध पाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या हनुमान जयंतीनिमित्त संस्थान परिसरात धार्मिक साहित्य विक्री खेळणी प्रसाद उपाहारगृहे अशी दुकाने लावण्यात आली होती


हनुमान जयंतीनिमित्त आयोजित सप्ताहाचा आज सरला बेट रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने समारोप करण्यात आला यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे संस्थानचे अध्यक्ष मिठू पाटील बारगळ जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते काल्याच्या कीर्तनानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप संस्थानच्यावतीने करण्यात आले
हनुमान जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक पायी दर्शनासाठी येणार असल्याने त्याच बरोबर दिवसभर मोठी गर्दी  असल्याने  पोलीस निरीक्षक सुरेश भुजंग हातमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दर्शनासाठी विविध ठिकाणाहून येणाऱ्या भाविकांच्या प्रवासासाठी जागा बसेस ची व्यवस्था करण्यात आली होती.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा