Video : चिडलेल्या कावळ्याने चालत असलेल्या लोकांवर केला हल्ला
सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना आपले हसू आवरणे कठीण जात आहे. प्राण्यांच्या हल्ल्याची भीती सर्वांनाच असते, पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही पक्ष्यांची भीती वाटू लागेल. या व्हिडिओमध्ये एक कावळा लोकांवर आपला राग काढताना दिसत आहे. काही सेकंदांचा हा ट्रेंडिंग व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. तर पाहूया या काय आहे हा प्रकार.
View this post on Instagram
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की काही लोक एका सोसायटीच्या गार्डन एरियामध्ये चालत आहेत. मात्र या लोकांना पुढच्या क्षणी आपल्यासोबत काय होणार आहे याची जराही कल्पना नाही आहे. काही क्षणातच अचानक एक कावळा येतो आणि मागून त्यांच्या डोक्यावर हल्ला करून निघून जातो. एका कावळ्याने त्यांच्यावर हल्ला केल्याचे समजताच लोक घाबरतात आणि त्याच्यापासून वाचण्याचा प्रयत्न करू लागतात.
ज्यांच्यावर हा हल्ला झाला आहे, त्यांना नक्कीच धक्का बसला असेल. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना आपले हसू आवरता येत नाही आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, हा कावळा मिशनवर आहे.