मालाड मध्ये भीषण आग

मुंबई :  मालाड-दिंडोशी दरम्यान खडकपाडा परिसरातील फर्निचरच्या गोदामांना आग लागली आहे. 
  सुरुवातीला एका फर्निचरच्या गोदामाला लागलेली आग अन्य गोदामांत पसरली.  लाकडी साहित्यांचे गोदाम असल्याने आग प्रचंड वेगाने पसरली व आगीचा मोठा भडका उडाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी अनेक गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. संपूर्ण आकाशात आग व काळ्या धुराचा प्रचंड लोळ उठत असल्याचे दिसत आहे.  धूर दूर अंतरावरून दिसत असल्याने आगीची तीव्रता लक्षात येते.
  खडकपाडा येथील आगीत अद्याप कोणतीही जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही. घटनास्थळावर अग्निशन दल,रुग्णवाहिका आणि पोलीस दाखल झाले आहेत. आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरूआहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा