बजाजनगर /संदीप साळे
औरंगाबाद तालुक्यातील वडगांव कोल्हाटी बजाजनगर ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक रणधुमाळी झाली आहे.सर्व पक्षीय कार्यकर्ते व उमेदवारांनी कंबर कसली आहे. भारतीय जनता पक्ष पुरस्कृत ग्रामविकास परिवर्तन पॅनलने सर्व उमेदवारांच्या प्रचाराचे बजाजनगरातील राम मंदिराच्या प्रांगणात माजी महापौर बापू घडमोडे याच्या हस्ते श्रीफळ फोडून शुभारंभ करण्यात आला
.
या वेळी भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अनिल चोरडिया, तालुकाध्यक्ष वसंत प्रधान, तालुका संघ सरचिटणीस सतीश पाटील व भारतीय जनता पार्टीचे पॅनल पुरस्कृत उमेदवार निलेश सोनवणे, वैशाली खेडकर, मोहिनी बजरंग पाटील, जयश्री काची, कृष्णा साळे, रमेश ताठे, वंदना गोराडे, अमित चोरडिया, माया सतीश पाटील, रमेश गायकवाड, आकाश पवार, संभाजी चौधरी, कल्पना सूर्यवंशी, जयश्री भोसले, रुस्तुम तळेकर, सुनीता जोशी, सुनिता खरात आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.