कापसाला विक्रमी 12 हजार रुपये क्विंटल भाव साठा करून ठेवलेल्या शेतकऱ्यांचा फायदा

कापसाला विक्रमी 12 हजार रुपये क्विंटल भाव साठा करून ठेवलेल्या शेतकऱ्यांचा फायदा

औरंगाबाद : दोन महिन्यापूर्वी दर घसरलेला कापसाला आता पुन्हा सोन्याचे दिवस आले आहेत. सध्या कापसाला 12 ते 13 हजार रुपयांचा भाव मिळत असून ज्या शेतकऱ्यांनी साठा करून ठेवलेला आहे ते लालेलाल होत आहेत. विशेष म्हणजे फरदड कापसाला हि 9 हजार 500 रुपयांचा दर मिळत मिळत आहे. यंदा अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट झाल्याने पुढे आले आहे. त्यामुळे कापसाला सुरुवातीपासून चांगला दर मिळत आहे. 

आठ दिवसापूर्वी दहा हजार पाचशे ते अकरा हजार पाचशे रुपये दराने कापसाची खरेदी केली जात होती. मात्र अचानक कापसाच्या दरात एक ते दीड हजार रुपयांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना फायदा होत आहे. परंतु अडचणीमुळे कमी भावात कापूस विकलेली शेतकरी मात्र नाराज झाले आहेत. फेब्रुवारीच्या सुरुवातीला कापसाचे दर एक ते दीड हजार रुपयांनी कमी होऊन आठ ते साडे आठ हजारापर्यंत भाव मिळत होता. आणखी भाव कमी होईल या भीतीने अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस लगेच विकून टाकला. 

आता भाव वाढल्याने शेतकऱ्याचे कापूस शिल्लक नसल्याने ते मनातल्या मनात कंठत आहेत. दरम्यान या दरवाढीवर कापसाचा साठा करून ठेवलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा