महाविकास आघाडीत फुटीचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे संकेत

महाविकास आघाडीत फुटीचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे संकेत

औरंगाबाद : राज्यात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर, आता महाविकास आघाडीचे (MVA)भवितव्य काय, असा प्रश्न अनेकांच्या मनात रेंगाळतो आहे. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सत्तेत असतानाही, मविआतील तिन्ही घटक पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस (Congress)यांच्यात फारशे सख्य नव्हतेच. कारभार शिवसेना आणि राष्ट्रवादी करते आहे आणि काँग्रेस अलिप्त असल्याची भावना होती. आता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेने परस्पर अंबादास दानवे यांची निवड केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संतप्त झाले आहेत. निर्णय घेताना विचारात घेतले जात नसेल तर, आघा़डीत राहायचे की नाही याचा विचार कारावा लागेल असे स्पष्ट वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. महाविकास आघाडी ही काही नैसर्गिक आघाडी नाही, एका विपरीत परिस्थितीत उभी राहिलेली आघाडी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

 नाराजीचे कारण काय ?

विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आल्यानंतर, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला हवे हते. मात्र शिवसेने अंबादास दानवे यांची निवड केली आणि त्यांच्या नियुक्तीचे पत्रच थेट दिले. त्यामुळे काँग्रेस नाराज झालेली आहे. हा निर्णय घेताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही विचारात घेतले गेले नसल्याने दोन्ही पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले नाना पटोले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की- आमची नैसर्गिक आघाडी नाही. ही आघाडी विपरीत परिस्थितीत झालेली आहे. राज्याच्या जनतेच्या हितासाठी त्यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनि्या गांधी यांनी आघाडी करणअयाचा निर्णय घेतला. आम्ही सत्तेत नव्हतो. विरोधी पक्षात बसण्याचा जनमताचा कौल होता, त्याचा आदर करुन आम्ही विरोधात बसणार होतो. ही मानसिकता होती. यांनी पहाटेचा शपथविधी केला. २०१९ पासून राज्यात महाभारत घडते आहे. महाराष्ट्राची बदनामी भाजपा करते आहे. राज्याने यांना पहिल्यांदा १०५ भाजपाचे आमदार निवडून दिले पण यांनी लोकशाहीचा तमाशा करण्याचे काम केले आहे. यांना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. विपरीत परिस्थितीत आमची आघाडी झाली होती, ही काही नैसर्गिक आघाडी नाही. असे सांगत त्यांनी मविआत फुटीचे संकेत दिले आहेत.

 a

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा