विद्यार्थिनीची छेड काढल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी-  अभाविप

विद्यार्थिनीची छेड काढल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी-  अभाविप

औरंगाबाद/ प्रतिनिधी - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची छेड काढल्याचे प्रकरण समोर आले आहे.  या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आली आहे.
सदर अधिकाऱ्याने विद्यार्थिनीशी रात्री-अपरात्री व्हाट्सअप च्या माध्यमातून गैरवर्तणूकपर संवाद केल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे.  विद्यार्थिनीने यासंदर्भात अंतर्गत तक्रार निवारण समितीकडे दि. ६ सप्टेंबर रोजी  लेखी तक्रार दिली असून अद्याप सुद्धा विद्यापीठ प्रशासनाद्वारे कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. विद्यापीठ प्रशासनातील अधिकाऱ्यावर करण्यात आलेले आरोप विद्यापीठाची प्रतिमा मलिन करणारे आहेत. ही बाब लक्षात घेता आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संभाजीनगर च्या शिष्टमंडळाने  कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांची भेट घेतली व विद्यापीठ प्रशासनाने समिती गठित करून सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी  महानगर मंत्री निकेतन कोठारी यांनी केली आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा